ऑनलाईन टीम/तरुण भारत
चिपळूण : कोकणात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे. (mumbai goa highway parshuram ghat landslide)
परशुराम घाटात वारंवार दरडी कोसळून मोठी हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन एप्रिल आणि मे महिन्यात हा घाट काही दिवसासाठी बंद करण्यात आला होता. यादरम्यान घाटातील धोकादायक डोंगरकटाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दरडी कोसळण्याचे प्रकार सुरुच आहेत. शनिवारी रात्री देखील साडेदहा वाजता परशुराम घाटातील देवाची पायवाट या ठिकाणी मातीचा डोंगर रस्त्यावर आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.