प्रतिनिधी, रत्नागिरी
मंगळवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे २ दुकाने फोडली. चोरट्यांनी या दुकानातील ऐवज लांबवला आहे. ही घटना बुधवारी (ता. 21)सकाळी उघडकीस आली.
संकेत देसाई यांचे हातखंबा येथे दोन गाळे आहेत.त्यांनी ते भाडयाने दिले होते.यामध्ये एका गाळ्यात गाड्यांचे पार्ट व मॅकेनिकचा व्यवसाय होता तर दुसऱ्या गाळयात सामान ठेवण्यात आले होते.या दोन्ही गाळ्यांचे पत्रे फोडून चोरट्यांनी गाळ्यात प्रवेश केला.आतील सामानाची चोरी करुन रोख रक्कम लंपास केली. मंगळवारी मध्यरात्री ही दुकाने फोडण्यात आली.बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या ही घटना निदर्शनास आली.अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









