मुंबई- मुंबई कस्टमने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून जवळपास २७ किलो मारीजुआणा ड्रग्स जप्त केले आहे. या घटनेत मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक केली असून अमेरिकेतुन मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याचा माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कस्टमने धडक कारावाई करत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतुन मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना काही दिवासापूर्वी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा होता. शुक्रवारी हे आरोपी निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्या सामानाची झडती घेतली. त्यांच्याकडे २७ किलो ड्रग्स सापडल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. २७ किलो वजनाचे मारीजुआणा ड्रग्स घेऊन संबंधित आरोपी मुंबईत दाखल होत त्यांनी ट्विटरवरून हि माहिती दिली आहे. या प्रकरणात मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक झाली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेतील आरोपीच्या घरात झडती घेतल्यानंतर 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबईतील आमली पदार्थांसंदर्भाती गुन्हेगारी वाढत आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे.