मराठा समाजाला जे आश्वासन दिलं होतं त्याउलट आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिलं असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी म्हटले आहे. तसेच येत्या काळात सरकार कंत्राटी पद्धतीने मंत्रीपद देणार आहे का ? असा सवालही त्यांनी विचारला.
ठाकरे गटाचे नेते वरूण देसाई सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही टेक्निकल आहे. मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकणात आलो आहे.” असे म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणसंदर्भात सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आश्वासन दिलं होतं त्याच्या अगदी उलट आश्वासन त्यांनी नागपूरमध्ये जाऊन दिलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरती आता उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पहावं.” असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच, “गेले एक सव्वा वर्ष अनेक लोकांची जॅकेट तयार आहेत नवीन बुटांना पॉलिश करून बसलेत. त्यामुळे सरकार आता कंत्राटी पद्धतीने मंत्रीपद देणार का ? मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आपण बोलूच. नाहीतर शोले चित्रपटाप्रमाणे कब है होली….कब है होली….त्याप्रमाणे कब है मंत्रिमंडळ विस्तार… अशी विचारण्याची वेळ येईल.” असे म्हणून त्यांनी सरकारला टोला मारला.
शेवटी बोलताना त्यांनी “उत्सव साजरा करण्याची परंपरा सगळीकडेच आहे. इव्हेंट साजरा करून कोणाचा बुरुज ढासळत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला भाजपने दांडिया चा आयोजन केले असेल तर तो करू शकत.” असे म्हटले आहे.