ऑनलाईन टीम / मुंबई.
मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषेत त्यांनी तीन मुद्द्यावर आपले मत मांडले तसेच भाजपवर आरोप करताना अमित शहांनी अगोदर शद्ब पाळला असता तर हे घडल नसतं असं वक्तव्य केले. पाठीत वार करून मुख्यमंत्री झालेला शिवसैनिक असूच शकत नाही असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
भाजपवर आरोप करताना माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “अमित शहांनी अगोदर शद्ब पाळला असता तर हे घडल नसतं. अडीच वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. पण यापुढे भाजपचा मुख्यमंत्री होणे आता शक्य नाही. तुम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याच बोलताय पण, पाठीत वार करून मुख्यमंत्री झालेला शिवसैनिक असूच शकत नाही.” असं बोलून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “आरे कारशेडचा प्रकल्प आहे तसाच राहू द्या. जो कांजूरमार्गाचा पर्याय चालू आहे, शासनाने त्याबरोबरच जावे अस त्यांनी सुचवल. आरेच्या परिसरात वन्यजीव आहेत. त्य़ांचाही विचार केला पहिजे. यासाठी मी पर्यावरणवाद्यांच्या बरोबर आहे. माझ्या पाठीत तुम्ही सुरा खुपसलाय पण तो मुंबईकरांच्या पाठीत खुपसू नका.” लोकशाही वाचवण्यासाठी आता लोकानी समोर आलं पहिजे हे सांगताना “लोकशाहीच्या चार स्तंभांनी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.








