ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई विमानतळावर (mumbai airport) एनसीबीच्या (NCB) मुंबई झोनल युनिटकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरोधात (drugs supply) कारवाई करत ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन (heroin) जप्त केले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मुंबई विमानतळावर ड्रग्ज सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने कारवाई केली. या कारवाईत बॅगमध्ये ड्रग्जचे चार पाकिटं आढळून आली आहेत.
मागील १३ मार्चला देखील दहीसर पोलिसांनी देखील ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई केली होती. यावेळी ६ किलो ५६० ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच या ड्रग्जची किंमत १ कोटी ९५ लाख रूपये इतकी होती. त्यावेळी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तिला ताब्यात घेण्यात आलं होतं.








