शिवसेना ( ठाकरे गटाचे ) नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबई महापालिकेत 6 हजार कोटी रुपयांच्या जंबो घोटाळ्याचा आरोप केला. मुंबईतील 400 किमीच्या रस्त्यांचे टेंडरमध्ये हा घोटाळा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, ” काही दिवसापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली होती, अशी घोषणा केली होती. या काँक्रीटीकरणासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून 5 हजार कोटींचं टेंडरही काढण्यात आले होते.
पण या टेंडरला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शिंदे- फडणवीस सरकारने 6 हजार 80 कोटी रुपयांचं टेंडर नव्याने काढले. या नव्याने काढलेल्या कोट्यवधींच्या टेंडरमध्येच हा ‘जंबो घोटाळा’ झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मुख्यंमंत्र्यांवर केलाय.
या घोटाळ्यामध्ये जीएसटीचे वेगळे पैसे लावण्यात आले असून या टेंडरच्या माध्यमातून कंत्राटदारांना एकूण 48 टक्क्यांचा फायदा करुन देण्याचा डाव शिंदे सरकाचा असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








