Multispecialty Hospital to be built in Upazila Hospital, district surgeon assured Kesarkar
उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्याचे लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी एस नागरगोजे यांनी सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना दिले आहे .त्यामुळे 26 जानेवारीला मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणीसाठी पुकारलेले आत्मदहन आंदोलन केसरकर यांनी स्थगित केले आहे .मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी पूर्वीच्या कुटीर रुग्णालयाच्या ठिकाणी जागा बघितली होती तेथे. भूमिपूजनही करण्यात आले .परंतु जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलेले नव्हते .हे रुग्णालय त्वरित उभारावे अशी मागणी जनतेतून होती. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय त्वरित उभारण्यासाठी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता, याची दखल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेऊन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत केसरकर यांनाही बोलावण्यात आले होते. त्यानंतर बाहेरचावाडा करून केली कुणकेरीरोड ,पोलीस परेड मैदान येथे जागा बघितल्या. परंतु त्या जागा संपादित करेपर्यंत वेळ लागणार म्हणून केसरकर यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या नव्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आणखी मजले उभारून मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय सुरू करावे अशी मागणी केली .यासंदर्भात दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले आणखी मजले उभारल्यास इमारती चा पाया या मजल्याना पिलेल काय याची खातर जमा करण्यात आली .आणखी मजले पेंलण्यास इमारत सक्षम आहे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले .त्यानंतर या नव्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आणखी तीन मजले उभारून मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकानी तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता मल्टी स्पेशलिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न संपुष्टात आला आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









