सततच्या तणावामुळे मेंदूच्या पेशींना पोहोचते नुकसान
अचानकपणे एखाद्याचा नावाचा विसर पडणे, फोन, चावी, चष्मा किंवा दैनंदिन स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत याचा विसर पडणे ही एक सामान्य समस्य आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ही समस्या धोकादायक ठरू शकते.
न्यूयॉर्क येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या इरविन मेडिकल सेंटरमधील न्यूरोसायकोलॉजिक एलिस कॅकापोला यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. दीर्घकाळापासून करत असलेल्या कामांचा विसर पडू लागल्यास मेंदूशी संबंधित गंभीर आजाराचा हा संकेत असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. सततच्या तणावाच्या स्थितीत शरीर अशा हार्मोन्सना रिलिज करतो, जे पेशींना नष्ट करतात. मेंदूची सामंजस्य प्रस्थापित करण्याची क्षमता प्रभावित होत स्मरणशक्ती कमी होऊ लागते.

रात्रीच्या झोपेत वारंवार व्यत्यय येणाऱ्या लोकांच्या एकाग्रतेत, स्मरणशक्तीत आणि मेंदूच्या कार्यप्रणालीत उल्लेखनीय घट होत असल्याचे जर्नल स्लीप मेडिसीनच्या अध्ययनात आढळून आले आहे. अल्प श्रवणशक्तीच्या स्थितीत मेंदूला बहुतांश परिश्रम गोष्टी ऐकण्यास आणि समजून घेण्यास करावे लागतात, यामुळे स्मरणशक्ती प्रभावित होत असते.
मल्टी टास्किंग
कुठल्याही कामादरम्यान लक्ष आणि नियंत्रणाशी संबंधित मेंदूच्या अनेक नेटवर्क काम करत असतात. मल्टी टास्किंगमध्ये हे नेटवर्क अडचणीत येत असल्याने स्मरणशक्ती प्रभावित होते. एंक्झाइटी, कोलेस्ट्रॉल, वेदना, रक्तदाब, झोपेशी संबंधित औषधे आणि काही प्रकारचे व्यसन मेंदूच्या न्यूरोट्रान्समीटर्सना ब्लॉक करतात. तसेच मेंदूची प्रक्रिया मंदावण्यास कारणीभूत ठरतात. आहारात पोषणाच्या अभावामुळे न्यूरॉन्सना नुकसान पोहोचते, पालेभाज्या, ग्रीन टी आणि टोमॅटोमध्ये आढळून येणारे फ्लेवोनॉयड्स मेंदूची क्षमता वाढवत असल्याचे संशोधन अहवालात म्हटले गेले आहे.









