लखनौ
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना 4 दिवसांपूर्वी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने लखनौला आणण्यात आले.
साधना गुप्ता यांनाही कोविडदरम्यान फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. 2020 मध्ये त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी असून त्या मुलायम यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या. साधना गुप्ता या भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या सासू आणि प्रतीक यादव यांच्या आई होत्या. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी साधना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.









