लखनौ
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे भव्य स्मारक निर्माण केले जाणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी केली आहे. मुलायम सिंह यांचे राजकीय जीवन या स्मारकात दर्शविले जाणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी सैफईमध्ये या स्मारकाच्या निर्मितीस शुभारंभ केला जाणार आहे. अमेरिकेतील अब्राहम लिंकन यांच्या स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले आहे.