लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल केअर युनिटमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यासंबंधीची माहिती हॉस्पिटलच्या एका निवेदनातून जाहिर केली गेली आहे.
22 ऑगस्टपासून समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून काल रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. समाजवादी पक्षातील एका जेष्ठ नेत्याने आपल्या ट्विटमध्ये मुलायम सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. सिंग यांचे चिरंजिव आणि सपा प्रमुख अखिलेश यादव गुरुग्राम रुग्णालयात दाखल झाले आहेत.
यासंबंधीची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्याशी बोलून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी मुलायम सिंह यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुलायमसिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. ते यूपी विधानसभेवर दहा वेळा आणि लोकसभेचे खासदार म्हणून सात वेळा निवडून आले आहेत. ते सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघतून विद्यमान खासदार आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









