मुंबई
बाजार भांडवलाच्या तुलनेमध्ये भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित झाले आहेत. या आधी हे स्थान अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी पटकाविले होते. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या ताज्या यादीमध्ये जगातील आघाडीवरच्या श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये अंबानी हे आठव्या स्थानी आहेत तर आशियात व भारतात ते सर्वात श्रीमंत व्यक्ति ठरले आहेत. असे जरी असले तरी यावषी अंबानांच्या तुलनेमध्ये अदानींची संपत्ती मात्र दुप्पट वाढली आहे. या निर्देशांकामध्ये 9 हजार 900 कोटी डॉलर्ससह अंबानी हे आठव्या स्थानी असून, 9 हजार 870 कोटी डॉलर्ससह अदानी हे नवव्या स्थानावर आहेत. पण 2022 वर्षाचा विचार करता अदानींची संपत्ती अंबानीच्या तुलनेमध्ये दुप्पटीने वाढली आहे. अदानीची संपत्ती यावषी 2 हजार 220 कोटी डॉलर्सने वाढली आहे. तर अंबानीची संपत्ती मात्र 969 कोटी डॉलरने वाढली आहे.