वाळवा/वार्ताहर
वाळवा येथे कृष्णा नदीच्या (Krishna River) हाळभाग ओढा पात्रामध्ये मळीचे काळेशार पाणी आज मोठ्या प्रमाणात आले असून, नदीतील जलचर प्राण्यांना व नदीचे पाणी पिणाऱ्या लोकांना यापासून मोठा धोका निर्माण होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
कृष्णा नदीत काही भागात मळी मिश्रीत पाणी सोडल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष द्यावे. तसेच संबंधितांवर कारवाई अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या वर्षात ओढापात्रामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर आल्यावर या पाण्यात मळीचे काळे पाणी दोन ते तीन वेळा सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक मासे मृत झाले आहेत. तसेच लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही जटील होत आहे. या प्रकाराबद्दल लोकांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.








