ऑपरेशन थिएटर परिसर चिखल-झाडा-झुडुपांच्या विळख्यात : नसबंदी मोहीम रखडण्याची शक्मयता
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदी मोहीम राबविण्याची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. श्रीनगर येथे गो-शाळेशेजारील जागेत ऑपरेशन थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. इमारतीच्या सभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून या चिखलातून ये-जा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे नसबंदीची मोहीम रखडण्याची शक्मयता आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या उपद्रवामुळे संपूर्ण जनता हैराण झाली असून रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. दिवसाढवळय़ा लहान मुलांना अंगणात सोडणे धोकादायक बनले आहे. रात्रीच्यावेळी कामावर जाणाऱया नागरिकांवर भटक्मया कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. तसेच अंगणात खेळणाऱया लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जाते. याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निविदा मागविल्या होत्या.
झाडेझुडुपे हटविण्याची गरज
या निविदा प्रक्रियेत दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. अलीकडेच कंत्राटदार निश्चित करून नसबंदी उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेने वर्कऑर्डर दिली आहे. तसेच कुत्र्यांच्या नसबंदीचे काम तातडीने सुरू करण्याची सूचना केली आहे. याकरिता श्रीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरचा वापर करण्याची सूचना महापालिकेने केली आहे. मात्र सदर ऑपरेशन थिएटर इमारतीभोवती चिखलाचे आणि झाडाझुडुपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये ये-जा करण्यास रस्ता नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरून कुत्र्यांची ने-आण कशी करायची? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. ऑपरेशन थिएटरजवळील समस्यांमुळे नसबंदी उपक्रम राबविण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम रखडण्याची शक्मयता आहे. येथील रस्ता व्यवस्थित करून झाडेझुडुपे हटविल्यानंतर कुत्र्यांचा नसबंदीचा उपक्रम मार्गी लागण्याची शक्मयता आहे.









