बीडब्ल्युएफसी उपविजेता, वसुंधरा चव्हाण उत्कृष्ट खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित अस्मिता खेलो इंडिया मुलींच्या आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत शेवटचे साखळी सामने शुक्रवारी खेळविण्यात आले. अव्वल गुणाच्या आधारे खेलो इंडिया स्पर्धेचे विजेतेपद एमएसडीएफ संघाला विजयी घोषित करण्यात आले तर बेळगाव वूमन्स क्लब बेळगाव संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
विजेत्या एमएसडीएफ संघात प्रणिता शंभूचे, सराह सौदागर, किंजल जाधव, जान्हवी चव्हाण, वसुंधरा चव्हाण, श्रावणी सुतार, साक्षी चिटगी, तेजल हन्सी, श्रद्धा पाटील, प्रांजल हजेरी, अवनी सानिकोप, रिया वाळके, ममता मुल्ला, लिहिता करची, जोया मुल्ला, पूर्वा भोसले, रीना देवी, राधिका एन. यांचा समावेश आहे. तर उपविजेत्या बेळगाव वूमन्स फुटबॉल अकादमी संघात ऊम्मेहानी पठाण, मयुरी तिम्मापुर, इफाहा अतार, इफिफा बडेभाई, शांभवी कांगले, लक्ष्मी चन्नावार, जनाब शेख, गौतमी जाधव, तनिष्का पाटील, सेलेष्टा मदुराई, युक्ता पाटील, रोहिणी कांबळे, श्रेया भातखंडे, एकता राऊत, वैभवी सायनेकर, प्राप्ती सुगरणी, तनिष्का लेंगडे, श्रुती सावली व सालवी या गोम्स यांचा समावेश होता.
शुक्रवारी साखळी सामन्यात एमएसडीएफ, बीटा, बेळगाव वूमन्स फुटबॉल अकादमी, सेंट जोसेफ ऑर्फज फुटबॉल एफसी, संत मीरा व सेंट जोसेफ एफसी यांच्या शेवटची साखळी सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेतील उपविजेतेपद बेळगाव वुमन्स फुटबॉल अकादमी, तर या स्पर्धेतील तिसरा क्रमांक सेंट जोसेफ ऑर्फंज एफसी-संतीबस्तावाड यांनी संपादन केले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, सेक्रेटरी अमित पाटील, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, एस. एस. नलगुडी, प्रशांत देवदम, रवी चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर विजेत्या उपविजेता आणि तिसरा क्रमांक पटकावलेल्या संघांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू वसुंधरा चव्हाण, उत्कृष्ट स्ट्रायकर साक्षी चिटगी, उत्कृष्ट मिडफिल्डर श्रुती चौगुले, उत्कृष्ट डिफेंडर गौतमी जाधव, उत्कृष्ट गोल रक्षक अमृता मुचंडी, उदयोमुख फुटबॉलपटू मारिया मुजावर, सर्वाधिक गोल श्रावणी सुतार यांना सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
वैष्णवी संकपाळ (सेंट जोसेफ), किंजल जाधव (एमएसडीएफ), ऊम्मेहानी पठाण (बेळगाव वूमन्स फुटबॉल अकादमी), चैत्रा वन्नुर (सेंट जोसेफ ओएफसी), दीपिका (संत मीरा एफसी), तनिष्का सप्रे (बीटा स्पोर्ट्स क्लब) यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.









