कलाश्री बंब अँण्ड स्टील फर्निचरच्या 15 व्या सोडतीतील रेनॉल्ट क्वीड या चारचाकी गाडीच्या भाग्यावान विजेत्या ठरल्या रुक्मिणी नगर, बेळगांव येथील रेश्मा शहापूरकर . उपस्थित मान्यवरांचा हस्ते विजेत्यांना गाडीची चावी देऊन सन्मान करण्यात आले .
यावेळी झालेल्या कार्यकमात उपस्थीत प्रमुख अतिथी बेळगावचे नूतन महापौर सौ. शोभा सोमनाचे, स्वरूप नर्तकी सिनेमागृहाचे संचालक श्री. अविनाश पोतदार, नगरसेवक श्री.रमेश मैल्यागोळ, समाज सेवक श्री. किशोर काकडे. आयुर्विमा महामंडळ ( L I C) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परशराम घाडी भारतीय जय भारत सोसायटीचे चेअरमन श्री. बी.आय. नेसरकर, व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र टिळकवाडी श्री. सिमाॅन मासकारनेस , पैलवान श्री. अतुल शिरोळे यांच्या हस्ते सर्वानी प्रथम दिपप्रज्वलन केले व नंतर कलाश्री निर्मीत थ्री इन वन या सोलार सिस्टीमचे फीत कापून उद्घाटन केले . यावेळी या सर्वांचा भेट वस्तू व पुष्प देऊन कलाश्रीचे संचालक श्री. प्रकाश डोळेकर यांनी सत्कार केला. प्रमुख अतिथीनी आपले मनोगते व्यक्त करताना कलाश्री उद्योग समुहाने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी यांबद्दल गौरव करून, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .त्यानंतर कार्यक्रमास वेळेत उपस्थित असलेले इतर भाग्यवान सभासद श्री.संतोष वरगे (केदनुर), सौ. विद्या पाटील (नेहरू नगर), सौ. प्रियंका नाकाडी (बिडी), सौ.विठ्ठल सांबरेकर (अनगोळ), श्री. नागप्पा कोंदूस्कोप (बसरिकट्टी) सौ. रेश्मा मासेकर (हिंदवाडी), पूजा मंडेकर (शिंदोळी ), श्री. बसवराज तोटड, पी. वाय. लोहार (राजाराम नगर), सौ. रेणुका खेमनालकर (कर्ले) यांचा पाहुण्याच्या हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कलाश्री बंब व स्टील फर्निचरच्या वतीने गेल्या दोन महिन्यातील रू. एक हजाराच्या किराणा खरेदीवरील कूपनची सोडत काढण्यात आली, त्यामधील पांच भाग्यवान विजेते श्री.पांडुरंग पाटील, श्री आप्पया डोळेकर, श्री. आनंद जी पाटील, एस.के. मिर्जे, श्री. आनंद हिरेमठ याना अनुकमे रु 5001/ 2501 / , 2001 / , 15O1 / , 1001 / चे वाऊचर देऊन सत्कार करण्यात आले. शेवटी अविनाश पोतदार यांनी उपस्थित सर्व ग्राहकांसमोर 15 व्या भाग्यवान विजेत्याची चिठ्ठी काढून रेश्मा शहापूरकर यांचे नाव घोषित केले व त्यांना गाडीची चावी सुपूर्त करून अभिनंदन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.डी पाटील यांनी तर आभार सुकन्या डोळेकर यांनी मानले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









