Ms. Gargi Redkar selected for “Football FIFA World Cup 2022” in Qatar
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभाग सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स चे सल्लागार संपादक, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे उपाध्यक्ष व रेडी गावचे सुपुत्र राजन रेडकर यांची कन्या गार्गी हिचे कपोल कॉलेज, मुंबई मधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करीत असताना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून कतार देशात होवू घातलेल्या “फुटबॉल फिफा वर्ल्डकप २०२२” याकरिता मुंबईतून निवड झाली आहे. कुमारी गार्गी ही दोन महिन्याकरिता कतार येथे होणाऱ्या फिफा वर्ल्डकप २०२२ करिता जाणार आहे.
शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कतार एअरलाईन्स ने दोहा, कतार करिता रवाना झाली. गार्गी ने या अभ्यासक्रम दौऱ्याकरिता निवड व्हावी याकरिता प्रत्यक्ष मुलाखती देवून यात हे यश मिळविले आहे. याकरिता गार्गीने भरपूर मेहनत घेतली होती असे तीचे वडील राजन रेडकर यांनी सांगितले.
गार्गीला मिळालेल्या या यशाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे मित्र प्रदिप रेडकर, रेडी, सिंधुदुर्ग यांनी एअरपोर्टवर केलेल्या सहकार्याबद्दल त्याचे राजन रेडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मुंबई पोलीस दलातील त्यांचे मित्र अधिकारी श्री गुलाम शेख, पीएसआय चार्ल्स पिंटो, केतन चव्हाण, श्री प्रभू साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल देखील त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
वेंगुर्ले / प्रतिनिधी









