ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे पेडवे येथील सौ. कल्पना वसंत परब (६८) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील वसंत परब यांच्या त्या पत्नी होत तर प्रसिद्ध बालकवी तथा शिरशिंगे मळई प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोहर परब आणि एकनाथ परब यांच्या त्या मातोश्री होत.