मुंबई:
एमआरएफ या कंपनीच्या समभागाने मंगळवारी शेअरबाजारात ऐतिहासिक टप्पा पार करण्यामध्ये यश मिळवलं आहे. कंपनीच्या पहिल्या वहिल्या लिस्टेड समभागाच्या भावाने मंगळवारी 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला. मंगळवारी सकाळच्या सत्रात कंपनीचा समभाग 1,00,300 रुपयांच्या विक्रमी स्तरावर व्यवहार करत होता. दिवाळीपर्यंत हा समभाग 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत चढू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.









