विघ्नेश, धनराज यांना उपविजेतेपद : दर्शन जी. उत्कृष्ट पोझर
बेळगाव : दावणगिरी येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना माया प्रेंडस ग्रुप आणि जीएसएन दावणगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मि.कर्नाटक श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत दावणगिरीच्या मंजुनाथ एस ने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि.दावणगिरी श्री हा मानाचा किताब पटकाविला. उडपीच्या विघ्नेशला पहिले उपविजेतेपद तर मंगळूरच्या धनराज याला दुसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. द. कन्नडच्या क्लिंटन याने मेन फिजिक्स चित्रदुर्गच्या दर्शन जी.ने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. दावणगिरीच्या मोती वीरप्पा महाविद्यालयाच्या मैदानावरती घेण्यात आलेली ही स्पर्धा आयबीबीएफ मुंबई यांच्या मान्यतेनुसार 8 विविध वजनी गटात घेण्यात आली.
निकाल पुढीलप्रमाणे
- 55 किलो गट : 1) रोहित माळवी बेळगाव, 2) शशी डीब्लूडी, 3) मोनीश एन.एम.दावणगिरी, 4) हेमंतकुमार मंदावली उ. कन्नड, 5) गोविंद यादव उडपी,
- 60 किलो गट : 1) आफताब किल्लेदार बेळगाव, 2) मदन जी. के. धारवाड, 3) चंद्रशेखर दावणगिरी, 4) दर्शन जी चित्रदुर्ग, 5)दादा कलंदर उ. कन्नडा,
- 65 किलो गट : 1) रमेश अंबीगाळ धारवाड, 2) मंजुनाथ बालीगार चित्रदुर्ग, 3) सोमशेखर कारवी उडुपी, 4) संतोष नाईक शिमोगा, 5) मंजुनाथ सोंटक्की बेळगाव, 70 किलो गट : 1) विघ्नेश उडुपी, 2) दिनेश आचार्य द. कन्नडा, 3) सत्यानंद भट म्हैसूर, 4) विनय डोनकरी बेळगाव, 5) केदार पाटील बेळगाव, 75 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) तापसकुमार नायक चित्रदुर्ग, 3) नागेंद्र मडिवाळ बेळगाव, 4) युसूफ आय. बी दावणगिरी, 5) सुनील भातकांडे बेळगाव,
- 80 किलो गट : 1) धनराज मंगळूर, 2) वरूनकुमार जी. दावणगिरी, 3) रवीकुमार बेंगळूर, 4) क्लिटंन द. कन्नडा, 5) अफ्रोज ताशिलदार बेळगाव,
- 85 किलो गट : 1) प्रशांत खन्नूकर बेळगाव, 2) विजय पी. धारवाड, 3) प्रसाद बाचीकर बेळगाव, 4) विशाल चव्हाण बेळगाव, 5) जहरसिंग उडपी,
- 85 किलो वरील गट : 1) मंजुनाथ एस. दावणगिरी, 2) गौतम उडपी, 3) आर. टी. सत्यनारायण दावणगिरी, 4) एन.डी. झाकर बेळगाव, 5) सुजीत शिंदे बेळगाव. यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. कर्नाटक श्री किताबासाठी रोहित माळवी, अफताब किल्लेदार, रमेश अंबीगार, विघ्नेश, प्रताप कालकुंद्रीकर, धनराज, प्रशांत खन्नुकर, मंजुनाथ एस. यांच्यात लढत झाली. त्यामध्ये मंजुनाथ एस., विघ्नेश व धनराज यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये दावणगिरीच्या मंजुनाथ एस. ने मि. कर्नाटक श्री मानाचा किताब पटकाविला. उडपीच्या विघ्नेशला पहिले उपविजेतेपद, मंगळूरच्या धनराजला दुसरे उपविजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट पोझरचा किताबाच मानकरी दर्शन जी. ने. पटकाविला.
मॅन फिजिक्स स्पर्धेत 1) क्लिटंन द. कन्नडा, 2) मंजुनाथ दावणगिरी, 3) सत्यानंद भट म्हैसुर, 4) गौतम एस.एम. बेंगळुर, 5) दादा कलीदंर यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते चषक, प्रमाणपत्र, मानाचा किताब, रोख रक्कम, पदके व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आशिया पंच अजित सिद्दण्णावर, जे. डी. भट, गंगाधर एम., दिलीपकुमार, किशोर, बसवराज अरळीमट्टी, राजु नलवडे, सुनील राऊत, राघवेंद्र, आसीफ, कृष्णा, आनस मेहबुब, योगेश व रवीगौडा यांनी काम पाहिले.









