बेळगाव :
बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग असोसिएशन व स्पोर्ट्स संघटना आयोजित मि. बेळगाव जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 164 शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, उद्योजक अमर आकनोजी, बसवानगौडा पाटील, एम. आर. चौगुले, मदनकुमार भैरपनावर, रवींद्र पाटील, राघवेंद्र पाटील, बीडीबीए स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते, सचिव राजेश लोहार, गिरीश धोंगडी, किशोर गवस, नारायण चौगुले, ज्यु. मि. इंडिया रणजित किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज व श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. इंडियन बॉडीबिल्डिंग व स्पोर्ट्स फेडरेशनच्या नियमानुसार सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातून पहिल्यांदाच या स्पर्धेत 165 शरीरसौष्ठपटूंनी भाग घेतला. बेस्ट फिजिक्स स्पर्धेत 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी नूतन संघटनेचे पदाधिकारी सुनील चौधरी, अनिल अमरोळे, बाबु पावशे, जितेंद्र काकतीकर, विजय चौगुले, चेतन ताशिलदार, सुनील बोकडे, भरत बाळेकुंद्री, विनोद म्हेत्री, अमित जडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बेळगावमध्ये सर्व खेळांना प्राधान्य
संभाजी उद्यान येथे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग व स्पोर्ट्स संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी उपस्थित राहून शरीरसौष्ठवपटूंना शुभेच्छा दिल्या. बेळगाव परिसरात सर्व खेळांना प्राधान्य दिले जात आहे. बेळगावात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ व शरीरसौष्ठव स्पर्धा जास्तीत जास्त प्रमाणात भरविल्या जात आहेत. शरीर कमाविल्याने आपण सदृढ बनतो, असे म्हणाले. त्यासाठी सध्याच्या तरुणांनी व्यसनाकडे न वळता शरीर सदृढ बनविण्याकडे वळले पाहिजे. बेळगावच्या या शरीरसौष्ठवपटुंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप मारली आहे. पोलीस दलातसुद्धा शरीरसौष्ठवपटू तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.









