ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 11 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. तसेच एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. तसेच या परीक्षेची एमपीएससीकडून लवकरच नवी अंतिम तारीख जाहीर होईल. सध्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मराठा संघटनांनी एमपीएससी परीक्षेला तीव्र विरोध केला होता. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.









