प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र लोकसेवा आयोग – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 सांगली व मिरज शहरातील एकूण 51 हायस्कूल /महाविद्यालयाच्या ठिकाणी उद्या, 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली व मिरज शहरातील हायस्कुल, महाविद्यालयाच्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ह्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








