प्रतिनिधी / करमाळा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग- दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा उद्या, शनिवारी (दि. ४) होणार आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ करमाळा आगाराने जादा एसटी बसेसची व्यवस्था केली आहे.
या परीक्षेसाठी सोलापूरला केंद्र आहे. या परिक्षार्थींची परिक्षेला जाणे येणेची सोय म्हणून करमाळा आगाराने सोलापूरसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बसेस अनुक्रमे 5.30, 6.00 व 6.30 ला करमाळा येथून निघतील. परतीच्या प्रवासासाठी 12.30, 13.00 व 13.00 वाजता या बसेस उपलब्ध असतील.
तसेच पुणे, नगर या मार्गावर देखील विद्यार्थी प्रतिसाद पाहता बस सोडण्यात येतील. या सर्व बसेसचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनाच्या काळात बसचा प्रवास सुरक्षित असेल. अधिक माहितीसाठी 02182- 20336, वाहतूक नियंत्रक पाटणे, करमाळा आगार (9822923374) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासन करमाळा आगार यांनी केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









