मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी करत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा चार सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आलेल्या पत्रावरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








