मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येवर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं कुठतरी एकुणच एमपीएसीची जी कार्यप्रणाली आहे, याचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे त्या ठिकाणी वेळ लागतो, मुलाखती होत नाहीत. आज तिथल्या अनेक जागा देखील रिक्त आहेत. एमपीएससीचे मेंबर्स देखील आपण भरलेले नाहीत. मला असं वाटतं हे योग्य नाही. शेवटी आमची जी ही तरूण मुलं आहेत, अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुलं अशाप्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. त्यामुळे सरकारला देखील आमची विनंती आहे. की एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन, कशाप्रकारे यामध्ये संपूर्ण परिवर्तन करून, याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, सरकार पोलीस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीनं स्पष्ट म्हटलं आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही, असा दावा फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलाय.
Previous Articleजिल्ह्यात लॉकडाऊनबाबत व्यवहार्य, व्यावहारिक भूमिका घ्या
Next Article एसएसएलसी परीक्षा रद्द करण्याची भाजप आमदाराची मागणी








