प्रयागराज
राज्यसभा खासदार आणि समाजसेविका सुधा मूर्ती तीन दिवस महाकुंभ मेळाव्यात गेल्या आहेत. याप्रसंगी त्यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक केले आणि देशातील तरुणांना अध्यात्म आणि भारतीय परंपरा स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. या भव्य सोहळ्याबद्दल विचार मांडले.
खासदार सुधा मूर्ती म्हणाल्या, भारताच्या प्राचीन परंपरांमध्ये रुजून राहणं खूप महत्त्वाचे आहे. कुंभमेळ्याचा एक भाग असलेल्या किन्नर आखाड्याला भेट देता आली, याबद्दल आनंद व्यक्त केला. ही भेट हा एक अतिशय समाधानकारक अनुभव असल्याचेही सांगितले.
“माझी येथे येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती संधी आता मला संधी मिळाल्याने मला आज खूप आनंद झाला आहे. हा महाकुंभ १४४ वर्षातून एकदा होतो. ही एक दुर्मिळ संधी आहे, इथे खूप चांगली व्यवस्था आहे, डिजिटल इंडियामधून खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. यूपी पोलिसांनी चांगले काम केले आहे. याठिकाणी मोठी गर्दी आहे, पण चेंगराचेंगरी नाही. हे चांगल्या नेतृत्वाचे प्रमाण आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि जेव्हा नेतृत्व मजबूत असते तेव्हा सर्वकाही व्यवस्थित होते.” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सोमवारी खासदार मूर्ती यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. मंगळवारी प्रयागराज येथील महाकुंभ येथील इस्कॉन कॅम्पमध्ये महाप्रसाद वाटण्यास मदत केली. त्या भव्य मेळाव्याला भेट देणाऱ्या भाविकांना चपाती वाटताना फूड काऊंटरवर उभ्या राहिल्या.
Previous Articleमालवणात उद्या ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान
Next Article रेल्वेच्या विकासासह सुविधासाठी सहकार्य करा









