कोल्हापूरः
शासनाच्या तज्ज्ञ समितीच्या पाहणीनंतर खासदार श्रीमंत शाहू महाराजांकडून काळम्मावाडी धरणाची पाहणी झाली. राधानगरीमधील काळम्मावाडी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीचा धरणाला धोका नाही , परंतु गळती काढणं गरजेचं आहे. यावेळी धरणाची पाहणी करताना शाहू महाराजांनी धरणातील पाणी घेऊन प्यायले. या गळतीविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, गळती काढण्याचे काम महत्त्वाचे आहे. या गळतीने धरणाला काही धोका नाही आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. १५ जानेवारी पासून गळती काढण्याचे काम सुरू होईल. येत्या दोन वर्षात ही गळती बंद करण्यात येईल. ९९ टक्के ही गळती बंद करण्याचा प्रयत्न होईल. गळतीकडे निश्चितपणे दुर्लक्ष झाल्यामुळे हे प्रमाण वाढलं आहे. पण यातून आता मार्ग काढून बाहेर पडायचं आहे. धरणातील पाणी अतिशय चांगल्या दर्जाचं आहे. शहराला थेट पाईपलाईनमधून हेच पाणी पुरविले जाते.









