प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. खासदार जगदीश शेट्टर यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे कौतुक करत प्रत्येकाने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळू शकले, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय जाधव होते. यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, आर. एस. मुतालिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नागेश मन्नोळकर, यल्लेश कोलकार, उमेश पुरी, भाग्यश्री कोकीतकर, वीणा विजापुरे, राजू देसाई, पंकज घाडी, माजी बुडा चेअरमन गुळाप्पा होसमनी, महेश मोहिते यासह इतर उपस्थित होते.









