कोल्हापूर :
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी मतदान करून आपला हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याचे वातावरण चांगले आहे. त्याशिवाय जनतेसाठी शासनाचा चांगला उपयोग होणार नाही. कालच आपण मुंबईमध्ये काय चाललं आहे हे पाहिलेलं आहे. विरोधक ज्या पद्धतीने काम करत आहेत, हे दिसून आलेले आहे.
महाविकास आघाडीला कोल्हापूरात चांगले यश मिळणारच आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे स्थिर सरकार येणार आहे. ज्या पद्धतीने मी मतदान करतो, त्या पद्धतीने सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे ही वक्तव्य खासदार शाहू महाराज यांनी केले.








