बेळगाव : हेलिपॅडवर पोहोचण्यास उशीर झाला आणि बेळगावचे खासदार इराण्णा कडाडी यांच्या समवेत इतर खासदार हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले. खासदारांना उशीर झाल्याने हेलिकॉप्टर दुसऱ्या प्रवाशांना घेऊन केदारनाथला निघाले आणि वाटेतच त्याचा अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातामध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला. राज्यसभा सदस्य इराण्ण्णा कडाडी हे आपल्या पत्नीसोबत डेहराडून येथे गेले होते. येथील बैठक संपल्यानंतर अन्य आठ खासदारांसोबत ते केदारनाथला जाणार होते. परंतु हेलिपॅडवर पोहोचण्यास त्यांना विलंब झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या व्यवस्थापकाने खासदारांऐवजी इतर प्रवाशांना घेऊन जाण्याचे निश्चित केले. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हेलिकॉप्टरने सर्व खासदार केदारनाथला जाणार होते. त्यापूर्वीच अपघाताची बातमी समजल्याने सर्व खासदारांना हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आले. तसेच पुढील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. खासदार व त्यांचे कुटुंबीय पहिल्या हेलिकॉप्टरमध्ये बसले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या हेलिकॉप्टरमध्ये महाराष्ट्रातील खासदार श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर खासदार होते.
Previous Articleबसवण कुडचीत विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









