शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रातील माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाला पहिल्यांदाच केंद्रात अधिकृतरित्या प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता आगामी काळातही मोदी सरकारकडून शिंदे गटाला अशा लहानसहान जबाबदाऱ्या देऊन केंद्रात अधिक प्रतिनिधित्व दिले जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय.
प्रतापराव जाधव यांचे वादग्रस्त विधान
कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख… यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके जायचे, असे वक्तव्य जाधव यांनी केले होते. त्यावरुन बराच वादंग झाला होता. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केले होते. सचिन वाझे १०० कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता. असा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









