गेल्या काही दिवसापासून कॉंग्रेस (Congress) विरुध्द भाजप असा सामना पहायला मिळत आहे. महागाईचा मुद्दा असो की सोनिया गांधी, राहूल गांधी यांची ईडी चौकशी यामुळे देशभरात काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान आता कॉंग्रेसच्या एका खासदारानं शिवराळ भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कॉंग्रेसचे राज्यातील खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांची भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे.
ते म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळात भ्रष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे. मंत्री भ्रष्टाचारी असले तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वांना क्लीन चीट दिलीय. त्यामुळं जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली.वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Government) टीका करतांना धानोरकर यांनी त्यांचा मोर्चा राज्यातील सत्ताधाऱ्यांकडं वळवला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








