वृत्तसंस्था/ पुणे
रविवारी येथे झालेल्या एनईसीसी-डेक्कन आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत जपानच्या मोयुका युचिजिमाने एकेरीचे जेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या टिना स्मिथचा पराभव केला.
डेक्कन जिमखान्यावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात युचिजिमाने स्मिथचा 6-4, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. युचिजिमाने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. यापूर्वी तिने 2021 च्या डिसेंबरमध्ये येथे ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. गेल्या महिन्यात नवी मुंबई येथे झालेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत युचिजिमाने एकेरीचे जेतेपद मिळविले होते. युचिजिमाने आतापर्यंत भारतात तीन वेळा स्पर्धा जिंकल्या आहेत.









