वाहनामध्ये निर्माल्य देण्याचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : गणेश चतुर्थीनिमित्त अनगोळ येथे निर्माल्य कुंड सुरू करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन निर्माल्य जमा करून त्याचे योग्य ठिकाणी विसर्जन केले जाते. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी हा उपक्रम गेली 9 वर्षे सुरू केला आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी त्या फिरत्या निर्माल्य कुंडाचे उद्घाटन करण्यात आले. जनतेने कोठेही निर्माल्य टाकू नये, कचराकुंडांमध्येही निर्माल्य टाकू नये. तर निर्माल्य कुंड गोळा करण्यासाठी वाहन आल्यानंतर त्या वाहनामध्ये ते निर्माल्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









