बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडसंबंधी टिप्पणी
बॉलिवूडसाठी मागील वर्ष फारसे चांगले राहिलेले नाही. बॉयकॉट ट्रेंडमुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. आता शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटालाही बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने कोलकाता येथील एका कार्यक्रमात बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडबद्दल भूमिका मांडली आहे.

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडबद्दल अजिबात सहमत नाही. बहिष्कार होत राहिला तर आम्ही लोकांचे मनोरंजन कसे करणार? लोकांच्या जीवनात आनंद आणि मजा कशी येणार? चित्रपट नसतील तर लोकांची करमणूक कशी होणार असे प्रश्नार्थक विधान करिनाने केले आहे.
मागील वर्षी प्रदर्शित करिना कपूर आणि आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ हा बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे फ्लॉप ठरला होता. तेव्हाही करिनाने बॉयकॉटवरून वक्तव्य केले होते. लालसिंह चड्ढा हा सुंदर चित्रपट असून लोकांनी मला आणि आमिरला सोबत पहावे अशी माझी इच्छा असल्याचे करिनाने म्हटले होते.
तर ‘पठान’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. चित्रपटाचे ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून विरोध सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाची पोस्टर्स जाळण्यात आली आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.









