Karnataka Election Result : सकाळपासूनची आकडेवारी पाहता कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप पिछाडीवर आहे. मात्र बहुमत मिळवण्यासाठी काँग्रसने हालचाली सुरु केल्या आहेत.यासाठी सर्व उमेदवारांना बंगळुरात हलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरची, विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास उद्याच विधिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचसोबत भाजपमध्येही हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते जेडीएसच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटकात जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
निकालाच्या आधीपासूनच काँग्रेस आणि भाजपची जेडीएसवर नजर होती. काठावरचे बहुमत आलं तर जेडीएस सोबत लागणारं हे दोन्ही पक्षांना माहीत होतं.कर्नाटकात त्रिपक्षीय अशी लढाई आहे.यात काँग्रेस, भाजप आणि जीडीएस आहे. त्यामुळे बहुमतांसाठी जेडीएसला सोबत ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.
मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले होते.त्यावेळी जेडीएस यांना जागा कमी असूनही मुख्यमंत्रीपद जेडीएसला देण्यात आलं होतं.त्यामुळे यावेळेस काय होतं हे पाहवं लागणार आहे. लोकसभेसाठी भाजपला कर्नाटकच्या जागा शाबूत ठेवण गरजेचं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








