गोडोली :
सातारा ते लोणंदकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.९५७ डी या महामार्गावर आरळे, वाढे, वहूथ गावालगत गती नियंत्रण ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पट्टे आहेत. या पट्ट्यावरुन वाहनांची मोठी वर्दळ असून रस्त्यालगत असलेल्या इमारतींना भूकंपासारखे कंपण होते. त्यामुळे इमारतींच्या भिंतीना तडे पडू लागले आहेत. पांढरे पट्टे काढून सोलर रेड लाईट लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत लेखी तक्रार राष्ट्रीय महामार्ग पुणे यांच्याकडे करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिली असून संबंधित अधिकाऱ्यांनी या तिन्ही गावातून कोणीडी कॉल केला तर ते घेत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांनी याकडे लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, वाढे, वहूथ, आरळे ग्रामस्थांनी दिला आहे.
या गावातून जाणाऱ्या राज्यमार्गावर अपघात प्रवण क्षेत्र असून तीव्र उतार, धोकादायक वळणे, शाळा असून त्याठिकाणी लाल रंगांचे सोलर दिवे गती नियंत्रणासाठी लावावेत. वडूचच्या अरूंद पुलाला बॅरिगेट लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्री. प्रसाद यांचा मोबाईल नंबर ७२०८० ४३९१५ यावर स्थानिकांकडून कॉल केले जातात. मात्र अधिकारी कॉल घेत नसल्याने आता पांढरे पट्टे हटावासाठी आंदोलन केले जाणार आहे.








