बेळगाव : पहिले रेल्वे गेट येथील बॅरिकेड्स हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन छेडण्यात आले. या ठिकाणी बॅरिकेड्स लावून 19 जून रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. तरीदेखील बॅरिकेड्स हटविण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उपोषण करण्यात आले. दोन पोलीस ठेवा, गैरसोयीची बॅरिकेड्स काढा, रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारा, अशा आशयाचे फलक दाखवून आंदोलन छेडले. बॅरिकेड्स हटवावेत, यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. अनेकवेळा बॅरिकेड्स हटविण्यासाठी आंदोलन छेडून लढा देण्यात आला आहे. प्रशासनाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. बॅरिकेड्स न हटविल्यास न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याठिकाणी बॅरिकेड्स लावल्याने शाळकरी मुले, पादचारी, वृद्ध, गर्भवती, जनावरांचे हाल होऊ लागले आहेत. शिवाय येथील व्यापाऱ्यांनादेखील फटका बसला आहे. त्यामुळे हे बॅरिकेड्स तातडीने हटवून याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. रेखा कोरेशट्टी, अजित नाईक, मदनरेवाळे, आनंद पाटील उपस्थित होते.
Previous Articleअनगोळ-मजगाव येथील शेतकऱ्यांचे पावसासाठी गाऱ्हाणे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









