साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नवव्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातील माउली स्पोर्टस्, विघ्नहर्ता, सरकार स्पोर्ट्स, कांतारा बॉईज संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून पुढीलफेरीत प्रवेश केला. उमेश गोरल, उमेश धावले, ऋषिकेश देवकाळे, विनोद तावले, दर्शन बांदेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात श्री गणेश शुक्रवार पेठ संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 65 धावा केल्या. त्यात पुंडलिकने 2 षटकार, 3 चौकारांसह 27 धावा केल्या. माउली देसूरतर्फे उमेश गोरलने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना माउली स्पोर्टस् 4.4 षटकात 5 गडी बाद 69 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात उमेश गोरल व प्रशांत यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. श्री गणेशतर्फे अक्षयने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात केआर शेट्टी विघ्नहर्ता संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 157 धावा केल्या. त्यात अक्षय धावलेने 13 षटकार व 3 चौकारांसह केवळ 28 चेंडूत नाबाद 101 धावा करून स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला दाजी नाईकने 5 षटकारासह नाबाद 43 धावा करून सुरेख साथ दिली. आरके बॉईजतर्फे शाहरूखने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरके बॉईजने 8 षटकात 3 गडी बाद 41 धावा केल्या. त्यात अन्सरने 24 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात सरकार गांधीनगरने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 112 धावा केल्या. त्यात ऋषिकेश धावलेने 5 षटकारसह 35, सतीश जाधव व सूर्या यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. अवल स्पोर्ट्सतर्फे निखीलने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अवल स्पोर्ट्सने 8 षटकात 7 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात महंतेशने 3 षटकारसह 28 धावा केल्या. चौथ्या सामन्यात कांतारा बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात विनोद तावलेने 3 षटकारासह 31, प्रवीण व दीपक यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे अंगधराज हितलमणीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्सने 8 षटकात 2 गडी बाद 73 धावा केल्या. त्यात समीर येळ्ळूरकरने 23 धावा केल्या. पाचव्या सामन्यात विघ्नहर्ता केआर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 112 धावा केल्या. त्यात दर्शनने 4 षटकारासह 25, राजेशने 2 षटकारासह 23 धावा केल्या. सरकार गांधीनगरतर्फे अप्पलीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सरकार स्पोर्ट्स गांधीनगरने 8 षटकात 9 गडी बाद 47 धावा केल्या. विघ्नहर्तातर्फे दर्शनने 5 धावात 3, समीरने 9 धावात 3 तर गुलफानने 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुधीर नेसरेकर, श्रीकांत फगरे, मारुती पाटील, नारायण फगरे, अमर सरदेसाई, विनोद केरूर, रणजीत मन्नोळकर, संजूकुमार, निखील एम. सी. यांच्या हस्ते ऋषिकेश धावले, अक्षय घाटवाल, दर्शन बांदेकर, विनोद तावले, उमेश गोरल यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुरुवारचे सामने
- बेळगावची नारायणी वि. लोकमान्य स्पोर्ट्स सकाळी 9 वा.
- शिवनेरी स्पोर्ट्स वि. ए. वाय. एम. अनगोळ सकाळी 10 वा.
- डी. जे. बॉईज वि. पहिल्या सामन्यातील विजेता सकाळी 11 वा.
- राजमुद्रा मंडोळी वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 12 वा.









