नवी दिल्ली ः
दमदार बॅटरी आणि अत्याधुनिक फिचरसोबत मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन येण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोटोरोलाचा प्रंटियर स्मार्टफोन चालू वर्षात जुलै महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
मोटोरोलाने आगामी काळात सादर होणाऱया स्मार्टफोनचे सादरीकरण होणार असल्याची पुष्टी दिली आहे. या फोनमध्ये 200 एमपी कॅमेरा आहे.
अन्य फिचर्सबाबत…
8के व्हिडीओ रिकॉर्डींग करता येणार
मोटोरोला प्रंटियरला 4,500एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
यासह अन्य अत्याधुनिक सुविधांचा यामध्ये समावेश राहणार









