किंमत 20 हजाराच्या घरात, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा
वृत्तसंस्था/ मुंबई
मोटोरोला या मोबाईल कंपनीने जी84 5जी स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन 12 जीबी रॅमसह 5 हजार एमएएच बॅटरी क्षमतेसह आला आहे. याला 33 वॅटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला वेगन लेदर फिनिश असून फोन दिसायला खूप सुंदर असल्याची माहिती देण्यात आली आहे. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज अंतर्गत येणाऱ्या फोनची किंमत 20 हजार रुपयापर्यंत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विवा मॅजेंटा, मार्शमॅलोव्ह ब्ल्यू या रंगात हा फोन सादर केला गेला आहे.

कधी होणार विक्रीस उपलब्ध
भारतामध्ये 8 सप्टेंबरला फ्लिपकार्ट आणि मोटोरोला यांच्या संकेतस्थळावर दुपारी बारा वाजल्यापासून स्मार्टफोन विक्रीकरता उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक हजार रुपयापर्यंत सवलत मिळणार आहे मात्र तिही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आहे अशांनाच. 6.5 इंचाचा पीओएलईडी डिस्प्ले असणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चीपसेट देण्यात आली आहे.









