सुरुवातीची किंमत 20,999 रु.राहणार
नवी दिल्ली : टेक कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारपेठेत नवीन एज आवृत्तीचा स्मार्टफोन सादर केला आहे. सादर करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे मॉडेल हे ‘मोटोरोला एज 50 फ्यूजन’ आहे. हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल सोनी एलवायटी 700 सी या प्राथमिक सेन्सर कॅमेऱ्यासह येणार असून आयपी68 वॉटर प्रूफ रेटिंग 5000 एमएएच बॅटरीसोबत 12 जीबी रॅम मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच सदरचा स्मार्टफोन हा भारतीय ग्राहकांसाठी 20,999 रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









