इस्लामपूर :
ताकारी-कराड रस्त्यावर भवानीनगर गावच्या हद्दीत चारचाकीने मोटरसायकलला समोरुन दिलेल्या धडकेत पांडूरंग बाळू चव्हाण (रा. तांदळगाव, ता. खानापूर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडला. यामध्ये आगाशिव पांडूरंग चव्हाण हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
आगाशिव चव्हाण व पांडूरंग चव्हाण हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर गाडी क्रमांक एमएच १० सी ए ७८२६ वरुन ताकारीहून कराडकडे चालले होते. आगाशिव चव्हाण हे गाडी चालवत होते तर पांडूरंग चव्हाण हे पाठीमागे बसले होते. भवानीनगर हद्दीत आले असता, कराडहून येणारी क्वीड गाडी क्रमांक एम. एच १० सीए ७८२६ ने दुसऱ्या एका चारचाकीस ओव्हरटेक करत असताना समोरुन येणाऱ्या स्प्लेंडर गाडीस धडक दिली. यामध्ये आगाशिव व पांडूरंग चव्हाण हे गंभीर जखमी झाले होते. तर चार चाकी गाडी ही रस्त्यावरून खाली उतरून ओढयात पडली होती. उपचारा दरम्यान चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर चारचाकी गाडी मध्ये असणारे चालक साहिल रफिक मुलाणी (रा. शामराव नगर कुपवाड, सांगली) व त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत.








