सात मोटारसायकली जप्त
बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला घटप्रभा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. संतोष धुळाप्पा पाटील (वय 32) रा. तुक्कानट्टी, ता. गोकाक असे त्याचे नाव आहे. घटप्रभा पोलिसांनी संशयावरून संतोषला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याने चोरलेल्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. संतोषने गोकाक, रायबाग व बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथून मोटारसायकली चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून यासंबंधीची माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली आहे. घटप्रभा पोलीस तपास करीत आहेत.









