सव्वालाखाच्या चार दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून न्यू गांधीनगर येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून सुमारे 1 लाख 18 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, एस. बी. गुंडलूर, बी. एस. रुद्रापूर, आर. बी. गनी, एम. व्ही. अरळगुंडी, व्ही. वाय. गुडीमेत्री, जी. पी. अंबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. रामलिंगखिंड गल्ली येथील एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सर्फराज मुल्ला (वय 34) रा. खुदादाद गल्ली, न्यू गांधीनगर असे त्याचे नाव आहे. 30 ऑक्टोबर 2022 रोजी रामलिंगखिंड गल्ली येथील एका शॉपिंग मॉलसमोरून दुचाकीची चोरी झाली होती. यासंबंधी 3 फेब्रुवारी 2023 रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. पोलिसांनी सर्फराजला अटक करून हिरो कंपनीच्या दोन एचएफ डिलक्स, एक स्प्लेंडर व एक डिओ अशा एकूण चार दुचाकी जप्त केल्या आहेत.









