वृत्तसंस्था/ चेन्नई
मंत्रा रेसिंगचा भारतीय रायडर हेमंत मुद्दप्पाने रविवारी येथे ‘एमएमएससी एफएमएससीआय भारतीय राष्ट्रीय मोटरसायकल ड्रॅग रेसिंग स्पर्धा 2024’च्या चौथ्या आणि शेवटच्या फेरीत आपले 15 वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
ट्रॅकवर पाऊल ठेवण्यापूर्वीच बेंगळुरूच्या या रायडरने 13 व्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. कारण त्याने 4-स्ट्रोक 1051 ते 1650 सीसी सुपर स्पोर्ट क्लासमध्ये 29 गुणांची भरून काढता न येणारी आघाडी मिळवली होती. रविवारी त्याने आणखी तीन वर्गांमध्ये भाग घेऊन एक अतुलनीय टप्पा गाठला आणि स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविताना दोन वर्गांतील जेतेपदे पटकावली.
माझी टीम मंत्रा रेसिंगसमवेत मागील आठ वर्षांचा प्रवास हा अविश्वसनीय राहिला आहे आणि हे सर्व अप्रतिम मेकॅनिक्समुळे शक्य झाले आहे. विजयोत्सवाचा हा क्षण माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या प्रत्येकाचा आहे, असे मुद्दप्पा म्हणाला. भारतीय मोटरस्पोर्ट्समधील 15 राष्ट्रीय विजेतेपदे मिळविणारा पहिला खेळाडू बनणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आणि आनंददायी आहे, असेही त्याने









