वारणानगर / प्रतिनिधी
Kolhapur News : क. सातवे ता. पन्हाळा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अमर सर्जेराव दाभाडे यांच्या विरोधात १३ विरूध्द १ मताने अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे – जाधव यांचे अध्यक्षतेखाली सरपंच अमर दाभाडे यांच्या अविश्वास ठरावावर आज सोमवार दि. २६ रोजी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभेत हात वरती करून सदस्यांनी मतदान करून अविश्वास ठराव मंजूर झाला.यावेळी मंडल अधिकारी अभिजीत पवार, तहसिलदार कार्यालयातील संतोष वाळके, आशिष कांबळे ग्रामसेवक शिवाजी चौगुले, तलाठी किशोर पाटील व सदस्य.उपस्थित होते.
पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे – जाधव यांचेकडे मंगळवार दि. २० जून रोजी सरपंच दाभाडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत शिवाजी आकाराम गोरड,महेश सदाशिव जाधव,अलका आनंदराव निकम,दीपाली सयाप्पा गोरड,सुप्रिया अरुण
वाळके,स्मिता संदिप घाटगे या सहा ग्रामपंचायत सदस्याच्या सह्यानेअविश्वास ठराव नोटीस दाखल केली होती.
ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करणे,गावाच्या विकास कामात अडथळा आणणे,गावातील विकास कामे ठप्प करणे,कर्तव्यात कसूर करणे.मनमानी कारभार करणे यासह अन्य कारणे अविश्वास ठरावाच्या नोटीसीत सरपंच अमर दाभाडे यांच्या विरोधात दाखल करण्यासाठी सदस्यानी कारणे दिली होती.









