भाजपचे माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांचा आरोप
दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा
मोती तलावाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे सुमारे एक कोटी रुपये या कामाचे अंदाजपत्रक आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा संकल्प आहे या कामाचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले होते मात्र काम सुरू झाले नव्हते परंतु आता जोरदारपणे काम सुरू झाले आहे गतवर्षी मोती तलावातील गाळ डोजरने काढताना मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळली होती .त्यामुळे सावंतवाडी बांधा महामार्ग मोती तलावाच्या बाजूने धोकादायक बनला होता या ठिकाणी पालिकेचा पदपाथही कोसळला होता त्यामुळे पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कुंपण घातले होते संरक्षक भिंत लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामाच्या 50 50 लाखाच्या दोन निविदा सार्वजनिक बांधकाम विभागांनी काढल्या होत्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कामाचे भूमिपूजन केले होते परंतु काम सुरू होत नव्हते महिना उलटला तरी काम सुरू झाले नव्हते परंतु आता कामाने गती घेतली आहे दगड टाकून त्यावर सिमेंटचे काँक्रीट टाकण्यात येत आहे त्यामुळे पाया मजबूत करण्याचा प्रयत्न ठेकेदाराचा आहे या ठिकाणी तलावाचे पाणी येत असल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे परंतु पंपाने पाणी काढले जात आहे काम सुरू असले तरी या ठिकाणी वाहतूक सुरू आहे यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी केली आहे तर कामाच्या दर्जाबाबत भाजपचे संजीव शिरोडकर यांनी शंका उपस्थित केली आहे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी वारंग शिरोडकर यांनी केली आहे संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे मात्र तलावातील येथे आहे हा गाळ काढण्यासंदर्भातही पाउल उचलणे आवश्यक आहे असे नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









